बारामती, 19 ऑगस्टः (उपसंपादक- अभिजीत कांबळे)बारामती शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. नुकतीच बारामतीमधील उच्चभ्रु भागात एकाच रात्री तब्बल 15 ते 16 घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. या घरफोडीनंतर शहरात खळबळ उडाली असून सध्या बारामतीकरांच्यात भीतीचे वातावरण आहे.
प्रबुद्ध युवक संघटनेकडून घर घर तिरंगा वाटप
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, शहरात देसाई इस्टेट, अशोक नगर, क्रीडा संकुल शेजारील प्लॅटमध्ये तसेच इतर ठिकाणी ही घरफोडी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चरणसिंग चव्हाण, मंदार सिकची, महावीर गायकवाड, सुभाष चव्हाण यासह इतर बारामतीकरांच्या घरी घरफोडीची घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे. या घरफोडी झालेल्या घरांमध्ये बारामती सहकारी बँकेचे संचालक तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
झेडपीचा बोर्ड ठरतोय खाजगी जाहिरातींसाठी उपयुक्त!
सदर घरफोडीत चोरट्यांनी तब्बल 25 तोळे सोने- चांदीचे ऐवज आणि रोख 1 लाख रुपयांवर डल्ला मारल्याची माहिती सांगण्यात येत आहे. सदर घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सध्या या घरफोडीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मध्यरात्री दबक्या पावलांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. त्यांच्या तोंडाला मास्क लावलेले दिसत आहे. यावरून शहरात चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचे या व्हिडिओवरून स्पष्ट दिसत आहे.
One Comment on “बारामतीत घरफोडी करणाऱ्यांचा व्हिडिओ आला समोर!”