बारामती, 31 जुलैः संभाजी भिडे मूळचे मनोहर भिडे याच्या विदर्भ दौऱ्यामध्ये अमरावती येथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबत खूप खालच्या थराचे वाईट वाईट शब्दात वादग्रस्त वक्त्याव्य केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल समाजामध्ये द्वेष निर्माण व्हावा, म्हणून विधान केले असून त्यांची तांबोडतोब चौकशी करून अटक करावी. त्याच्या निषेधार्थ बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, बारामती याच्या वतीने निषेध सभा व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिरायत भागासाठी वरदान ठरलेला पुरंदर उपसा शेतकऱ्यांना उपयुक्त?
या आंदोलनास काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, संभाजी बिग्रेड, बौध्द युवक संघटना, आरपीआय (आ – गट), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बारामती आदी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकमतांनी पाठिंबा दिलेला आहे.
सदर निषेध सभा ही मंगळवारी 1 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजता बारामती शहरातील हुतात्मा स्तंभ, वंदे मातरम चौक, (भिगवण चौक) येथे आयोजित केली आहे. त्यानंतर निषेध मोर्चाला सुरुवात होईल. सदर मोर्चा हुतात्मा स्तंभ ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक ते प्रशासकीय भवन मोर्चा असा असेल.
भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हा सचिवपदी काशिनाथ पिंगळे यांची निवड
सदर निषेध सभा आणि मोर्चामध्ये बारामतीमधील नागरिकांनी, सर्व राजकीय पक्षांनी, सर्व संघटनेंनी, महात्मा गांधी विचारसरणीच्या सर्व जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने निलेश कोठारी यांनी केले आहे.
One Comment on “संभाजी भिडेंच्या वक्त्याव्याचे निषेधार्थ मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन”