मोरगाव/ खंडुखैरेवाडीः (प्रतिनिधी- शरद भगत) आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपुर्ण राज्यभरात विठुरायाच्या दर्शनासाठी संताच्या पालख्या कालच 28 जून (बुधवारी) 2023 रोजी पंढरपुरात दाखल झाल्या. आज, (गुरुवारी) 29 जून रोजी पाहटेपासून दिंडीतून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांनी प्रिय पांडुरंगाचे दर्शन घेतले. आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठ्या चार एकादशींपैकी एक आहे. या एकादशीला राज्यभरातून लोक पंढरपुरात येत असतात.
ही संस्कृती भावी पिढीला समजण्यासाठी व परंपरा कायम चालू रहावी, यासाठी बारामती तालुक्यातील मोरगाव गावाजवळील खंडुखैरेवाडी येथील राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुलच्या वतीने पालखी कार्यक्रमाचे आयोजन (बुधवारी) 28 जून 2023 रोजी करण्यात आले होते. या पालखी वारीमध्ये नर्सरी ते इयत्ता दहावीचे विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभुषेत दिंडीमध्ये सहभागी झाले होते. राजे प्रतिष्ठान न्यु इग्लिंश स्कुलवर या पालखीचे उभे रिंगण पार पडले, तर मोरगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वारकरी फुगडीचे तसेच आकर्षक कार्यक्रम सादर केले. पालखी मयुरेश्वर मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांना पाणी व थोडा अल्प प्रहार देण्याात आला.
बानपच्या नगर रचनाकार पदी रमेशकुमार आवताडे यांची नियुक्ती
राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुल हा पालखीचा कार्यक्रम गेली 16 वर्षांपासुन राबवत असून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा वारसा समजावा, यासाठी राजे प्रतिष्ठान हा कार्यक्रम राबवत असते. वारीमध्ये सर्वधर्मातील, सर्व जातीतील विद्यार्थी ही सहभागी झाली होती.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुलच्या प्रिसिंपल मनिषा खैरे, मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उद्धव वाबळे व सहशिक्षिका- प्रतिक्षा ताकवले, रोहीणी भोंडवे, मीना तावरे, वैशाली भोंडवे, सोनाली मदने, जाधव मिस, धनश्री मिस, ढमे मिस, सुतार मिस तसेच सहशिक्षक- राहुल यादव, राजाराम खैरे, सुमित जगदाळे, रविंद्र जाधव यांनी ज्यास्त मेहनत करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. तसेच विद्यार्थ्यानां मोरगाव या ठिकाणापर्यंत बसने सोडवण्याचे काम सर्व बस चालकांनी केल्याची माहिती वैभव जराड यांनी दिली. या पालखी सोहळ्याचे दर्शन घेत विद्यालयाला शुभेच्छा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलिप खैरे यांनी दिल्या.
‘त्या’ पारधी अनाथ मुलांसाठी पोलिसांनी खुलं केलं शिक्षणाचे दार!
2 Comments on “आषाढी एकादशीनिमित्त राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुलचा पालखी सोहळा संपन्न”