पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अनुसूचित जातीमधील माने कुटुंब उद्ध्वस्त!

बारामती, 25 जूनः (प्रतिनिधी- अभिजीत कांबळे) बारामती प्रशासकीय भवनाच्या मागील गेट जवळ 5 जून 2023 रोजी स्वतःला पेटवून आत्मदहनचा प्रयत्न करणाऱ्या रोहिदास जनार्दन माने (वय 40, रा. मौजे रेडा, तालुका- इंदापूर) यांचा उपचाराच्या निष्काळजीमुळे 23 जून 2023 रोजी सकाळी 11 च्या सुमारास मृत्यू झाला. रोहिदास माने यांचा मृतदेह सध्या पुण्यातील ससून येथील शव-घरात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.

रोहिदास माने यांच्या मृत्यूस बारामती- इंदापूर पोलीस प्रशासन आणि बारामती- इंदापूर महसूल प्रशासन तसेच इंदापूर तालुक्यातील मौजे रेडा गावातील माने वस्तीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला विरोध करणारे शेजारील पवार आणि इतर काही सवर्ण लोक कारणीभूत आहेत, असा आरोप माने कुटुंबाकडून करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करून सदरचा रस्ता सरकारी नोंद करून त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी मागणीही माने कुटुंबियांकडून करण्यात आली. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही, तो पर्यंत रोहिदास यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका माने कुटुंबाच्या वतीने घेण्यात आली आहे.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मुर्टी शाळेत दिंडी सोहळा साजरा

सदर प्रकरणात बारामती पोलिसांच्या वागणूकी आणि हलगर्जीपणावर मोठ्या प्रमाणावर टिका होताना दिसत आहे. दरम्यान, माने कुटुंब आत्मदहन करणार असल्याची पुर्व कल्पना बारामती शहर पोलीस स्टेशनच्या सबंधित अधिकाऱ्यांना सीआडी आणि एसआयटी पोलीस विभागतील अधिकाऱ्यांना दिली होती. तरीदेखील उपोषणाच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदबस्त दिला गेला नाही. सदर आत्मदहनाआधी रोहिदास माने यांचे उपोषण मागील 4 दिवसांपासून सुरुच होते. पाचव्या दिवसी,  5 जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला याआधी केलेल्या अर्जात दिला होता.

ज्या दिवशी, 5 जून 2023 रोजी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला, त्या दिवशी, घटनेनंतर बारामतीचे उपविभगिय पोलीस अधिकारी घटनस्थळी सर्वात उशिरा दाखल झाल्याने आणखीन संशय वाढतो. रोहिदास मानेंनी 5 जून रोजी आत्मदहन करणार हे निवेदनाद्वारे आधीच सांगितले होते, तरीसुद्धा बारामतीचे पोलीस अधिकारी हे आंदोलनच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार रोखण्यासाठी उपस्थित नव्हते, हे विशेष.

रोहिदास माने हे अनुसूचित जातीमधील असल्याकरणाने तर बंदोबस्त ठेवला गेला नाही ना? असा प्रश्न आता यानिमित्ताने निर्माण होत आहे. या उलट, संबंधित रस्त्याला विरोध करणारे लोक ज्यावेळी आंदोलनासाठी आले होते, त्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी बारामती शहर पोलीस अधिकाऱ्यांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खासगी वसुली एजेंट गुंडांचा बारामतीत सुळसुळाट; सर्वसामान्यांना लुबडण्याचे वाढले धंदे!

ज्या वेळी रोहिदास माने आणि त्यांचे कुटुंब हे रस्त्याच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले होते, त्यावेळी बारामतीमधील संबंधित एकही पोलीस अधिकाऱ्यांनी रोहिदास माने व त्यांच्या कुटुंबासोबत कोणत्याही चर्चाही केली नाही किंवा माने कुटुंबांमधील कोणत्याही व्यक्तींना सोबत घेत चर्चा करण्याचा प्रयत्नही केला गेला नाही. या हलगर्जीपणामुळे अनुसूचित जातीमधील एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. जर संविधानिक मार्गाने अशा लोकांच्या मागण्याकडे तातडीने विचार केला जात नसेल तर दाद मागायचा कुणाकडे? असा प्रश्न अनुसूचित जाती- जमाती लोकांना पडायला लागला आहे.

अनुसूचित जाती- जमातीमधील लोकांना विशेषतः टारगेट करून पोलीस प्रशासन त्यांच्यावर तडीपारची व मोक्याची नेहमी कारवाई करण्यास तयार असतात. या उलट इतर जातीतील लोकांनी अनुसूचित जातीतील लोकांवर अत्याचार केला, तरीसुद्धा किंवा आर्थिक पिळवणूक केली, तरीसुद्धा त्या लोकांवर अशा प्रकारच्या कारवाई होताना दिसत नाही. मोठ मोठ्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा या लोकांना अडकवण्यासाठीची कारवाई केली जाते. पोलिसांच्या अशा दुजाभावामुळे अनुसूचित जाती जमातीवर आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

2 Comments on “पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अनुसूचित जातीमधील माने कुटुंब उद्ध्वस्त!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *