बारामती, 23 जूनः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) नुकताच भारतासह जगभरात 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. बारामती तालुक्यातील मुर्टी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शाळेतदेखील जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. या योग दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही योग करण्याचा मोह आवरला नाही.
खासगी वसुली एजेंट गुंडांचा बारामतीत सुळसुळाट; सर्वसामान्यांना लुबडण्याचे वाढले धंदे!
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून योगासनातील काही योग आसन कृतींचा सराव केला. तसेच त्या योग आसनाचा फायदा देखील सांगण्यात आला. तसेच नियमित योग करण्याचाही सल्ला विद्यार्थ्यांसह शिक्षकांना यावेळी देण्यात आला आहे. याचा व्हिडिओ भारतीय नायक चे प्रतिनिधी बाळासाहेब बालगुडे यांच्या हाती लागला आहे.
संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यानंतर बानप ने घेतली स्वच्छतेची जबाबदारी
One Comment on “श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी शाळेत योग दिन साजरा”