आश्वासनानंतर धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित

बारामती, 18 जूनः बारामती येथील तहसील कार्यालय येथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी 15 जून 2023 पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते.  मात्र तीन दिवसानंतर आंदोलनकर्ते अनिकेत मोहिते, भास्कर दामोदरे, अभिलाष बनसोडे, विनय दामोदर, मंगलदास निकाळजे, जितीन कवडे, कृष्णा साळुंके यांच्या सोबत तहसिलदार, जन आरोग्य योजनेचे जिल्ह्याचे अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर सदरचे बेमुदत चक्रीय उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती भास्कर दामोदरे यांनी दिली.

विनयभंगाचे आरोपातुन संतोष जाधव यांची निर्दोष मुक्तता – अ‍ॅड. जावळे

सदर बैठकीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेसंबंधी गैरवर्तन करणाऱ्या हॉस्पिटल, आरोग्य मित्र यांच्यावर कारवाई करत यामध्ये सुधारणा करू, असे आश्वासन दिले. तसेच मेलद्वारे संबंधित आंदोलनच्या मागण्या पुरतता करण्याचे पत्र पाठवू, असे तहसिलदार यांच्या समक्ष सांगितले. तसेच मागण्या पुर्ण न झाल्यास पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनिकेत मोहिते, विनय दामोदरे, मंगलदास निकाळजे यांनी यावेळी दिला. तसेच सदर धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे जाहीर केले.

बारामती एमआयडीसीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे गोल बंगाल!

One Comment on “आश्वासनानंतर धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *