शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता?

मुंबई, 9 जूनः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी शरद पवारांना देण्यात आली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांना भेटून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शरद पवारांना काहीही झाल्यास त्यास राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असतील, असे म्हटले आहे.

तर सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने आरोपींना तातडीने गजाआड करून खरा मास्टर माईंड शोधावा, अशांना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून प्रशासनाला निवेदन

दरम्यान, शरद पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचे त्याच्या फेसबुकवरील पोस्टवरून समजत आहे. सदर संशयिताला भाजपचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न अजित पवार यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीनगरला औंरंगाबादच म्हणणार असे, शरद पवार म्हणाल्याची चुकीची बातमी एका माध्यमाकडून दाखवण्यात आले होते. त्यानंतर त्या माध्यमाने ट्विटरवर दिलगिरीही व्यक्त करण्यात आली. धमकी आल्यानंतर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यासह पवारांच्या पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ‘राजकारण महाराष्ट्राचे’ असं या ट्विटर हँडलचे नाव असून हे हँडल कुठली व्यक्ती चालवते, हे अद्याप अस्पष्ट आहे.

मुर्टीत भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक संपन्न

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

One Comment on “शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *