मुर्टीत भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक संपन्न

बारामती, 7 जूनः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी गावात नुकतीच 4 जून2023 रोजी पत्रकारांच्या हस्ते वृक्षरोपण करून बैठक झाली. संघातील पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत इयत्ता दहावीत नंबर मिळवलेल्या सिद्धिका सतीश बालगुडे व श्रावणी कारंडे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नवनिर्वचीत बाजार समितीचे संचालक बाळासो गुलाब जगदाळे, बारामती दुध संघाचे नवनिर्वाचित संचालक संतोष शिंदे यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

बड्या मंडळींच्या अतिक्रमणाविरोधात प्रबुद्ध युवक संघटनेचे आंदोलन

सदर बैठकीत मुर्टी ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण जगदळे यांनी पत्रकारांचे आभार मानत भारतीय पत्रकार संघ नेहमीच सत्याच्या बाजूने रहातो, असे अभिमानाने सांगितले. तसेच श्री छत्रपती विद्यालयातील श्रावणी कारंडे या छोट्या कवियत्रिने स्वयंम रचित महाराष्ट्र माझा ही कविता साधर करत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

यावेळी भारतीय पत्रकार संघाची ही नवी कार्यकारिणी करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे तर उपाध्यक्ष शांतनु साळवे यांची निवड करण्यात आली. तर पत्रकार हल्ला कृती समिती प्रमुख निखिल नाटकर यांची नियुक्ती झाली.

माझी वसुंधरा अभियानात बारामती नगरपरिषदेचा पुन्हा डंका

या बैठकीत भारतीय पत्रकार संघाचे सदस्य शरद भगत यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त झाडांच्या सुरक्षेसाठी पाच ट्री गार्ड दिली. कार्यक्रमाचे आयोजन शरद भगत यांनी केले. या कार्यक्रमासाठी काशिनाथ पिंगळे, सोमनाथ लोणकर, सोमनाथ जाधव, महम्मद शेख, दत्ता जाधव, माधव झगडे, निखिल नाटकर, अविनाश बनसोडे, विनोद गोलांडे, शांतनु साळवे, शरद भगत व अन्य पत्रकार उपस्थित होते.

One Comment on “मुर्टीत भारतीय पत्रकार संघाची मासिक बैठक संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *