बारामती, 30 मेः बारामती नगर परिषदेच्या हद्दीतील बेकायदेशीर होर्डिंग्सवर गेल्या काही दिवसांपासून मोठी कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई ही बारामती नगर परिषदेकडून करण्यात येत आहे. दरम्याणच्या काळात नगर परिषदेच्या हद्दीत बेकायदेशीर मोठ मोठे होर्डिंग्स (जाहिरात फलक) उभरण्यात आले होते. तसेच या जाहिरात फलकांमुळे नगर परिषदेचा कर तर बुडत होताच, तसेच जीवितहानी होण्याचाही धोका उद्भवत होता.
दरम्यान, पुण्यातही मोठ मोठे होर्डिंग्स पडून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, बारामती नगर परिषदेला शहर परिसरातील बेकायदेशीर होर्डिंग्स काढण्यासाठी तसेच होर्डिंग्स मालकांवर कारवाई करण्यासाठी प्रबुद्ध युवक संघटनेकडून अर्ज करण्यात आला होता. या अर्जाची दखल घेत पावसाळा सुरु होण्याआधीच नगर परिषदेने या बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाईचा हातोडा उचलला आहे.
चिरेखानवाडी ते भोईटे वस्ती रस्त्याच्या साईट पट्टीची दुरावस्था
One Comment on “बारामतीमधील बेकायदेशीर होर्डिंग्सवर मोठी कारवाई!”