डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपशब्द वापरणाऱ्याचा जामीन फेटाळला

माळशिरस, 14 मेः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द आणि शिवराळ भाषा वापरल्या प्रकरणी माळशिरस येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश एम. एन. पाटील यांनी आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे पिराळे ता. माळशिरस येथील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 21 एप्रिल 2022 रोजी 7.58 च्या सुमारास आरोपीचे संभाषण असलेली ऑडियो रेकॉर्डिंग क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये आरोपीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द आणि शिवराळ भाषा वापरल्याबाबतची फिर्याद पिराळे येथील प्रमोद शिंदे यांनी नातेपुते पोलिस ठाण्यात केली होती. नातेपुते पोलिसांनी आरोपीस अटक करून कोर्टात हजर केल्यावर आरोपीने नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपी तर्फे तो मनोविकृत असलेबाबत तसेच सदर गुन्ह्यात अ‍ॅट्रोसिटी कायदा लागू होत नसल्याचा बचाव घेण्यात आला होता. तसेच सदर गुन्हा सार्वजनिक ठिकाणी नसल्याचे सांगितले. त्यास सरकारी वकिलांनी विरोध करत गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून तपास पुर्ण झाला नसल्याने अर्ज ना मंजूर करण्याची विनंती केली. मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. सुमित सावंत यांनी आरोपी मनोरुग्ण नसल्याचे आणि सदर गुन्ह्यात अ‍ॅट्रोसिटी लागू होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर युक्तिवाद गृहीत धरून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे. सदर केसमध्ये सरकारी वकील म्हणुन अ‍ॅड. संग्राम पाटील यांनी काम पाहिले. तर फिर्यादी तर्फे अ‍ॅड. सुमित सावंत यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *