बारामती, 27 एप्रिलः बारामती शहरासह परिसरामध्ये जोडप्यांना खोल्या काही तासासाठी भाड्याने दिल्या जातात. या कपल्समध्ये बऱ्याचदा महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांचा सुद्धा समावेश दिसत आहे. या प्रकारच्या तक्रारी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे तसेच बारामती शहरातील महिला व पुरुषांच्या टिमच्या मदतीने बारामती शहरातील स्वागत लॉज, महालक्ष्मी लॉज, गंगासागर लॉज, कॅप्टन लॉज आदी सर्व लॉज भर दुपारी चेक केल्या. त्यामध्ये कुणी मिळून आले नाही. परंतु सदर रजिस्टरमध्ये जुन्या नोंदी असल्याचे स्पष्ट झाले.
तहसिल कार्यालयातील इंटरनेटमुळे सर्वसामान्यांचे हाल
त्यानंतर पोलिसांचा ताफा यशवंत लॉज या ठिकाणी गेला. या यशवंत लॉजमध्ये सहा खोल्यांमध्ये काही महिला व तरुण हे मिळून आले. त्यांच्या नातेसंबंधाबाबत त्यांना व्यवस्थित उत्तर देता आले नाही. त्या लोकांना पोलीस ठाण्यात आणून अश्लील चाळे करण्यासाठी ते लॉज मध्ये आले होते. लॉज सार्वजनिक जागा आहे, त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली . न्यायालयात सदर बाबत खटला पाठवण्यात येईल. तसेच यशवंत लॉजवर त्यांना परवानाच्या नियमाची भंग केला म्हणून महाराष्ट्र पोलीस कायदा 30 डब्ल्यू 131 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदर लॉज हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा बारामतीचे माजी उपनगराध्यांचे असल्याचे माहिती समोर आली आहे.
सहाय्यक निंबधकांकडून चिन्ह वाटपात घोळ?
One Comment on “बारामती शहरासह परिसरातील लॉजची पोलिसांकडून चेकिंग”