बारामती, 14 मेः बारामती तालुक्यातील माळेगाव येथील देवीलाल पेमाराम कुमावत यांच्याकडे पीडित महिलेचे पती बांधकाम मिस्त्री म्हणून काम करायचे. त्यावेळी पीडित महिलाचे प्रकाश कुमावत याच्यासोबत प्रेम संबंध निर्माण झाले. त्यानंतर ते दोघेही व्हाट्सअॅपवर चॅटिंग करू लागले. या दरम्यान, ते दोघेही एकमेंकांना अर्धनग्न फोटो तसेच सोबत असलेले फोटो शेअर केले. तत्पुर्वी प्रकाश कुमावत याने या चॅटिंगचे स्क्रीन शॉट काढून ठेवले.
दरम्यान, पीडित महिलेचा पती कुमावत यांच्याकडून काम सोडून दुसरीकडे गेले. त्यावेळी प्रकाश कुमावत आणि त्याच्या पत्नी पायल कुमावत या दोघांनी पीडित महिला आणि तिचा पती यांना सांगितले की, त्यांच्याकडे कामाला परत या. मात्र पीडित महिलेच्या पतीने कामावर येण्यास नकार दिला. त्यानंतर प्रकाश कुमावत आणि त्याच्या पत्नी पायल यांनी पीडित महिलेचे प्रकाश सोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित महिला आणि तिच्या पतीच्या नातेवाईकांना सदर फोटो पाठवले.
यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेत प्रकाश कुमावत आणि पायल कुमावत यांच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून दोघा पती पत्नीवर टेक्नॉलॉजी अक्ट 2000 कलम 67 व भादवि कलम 506 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच त्यांचा मोबाईल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस नाईक जाधव करीत आहेत.