मुर्टी ग्रामपंचायतीत लटकवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पूजन

बारामती, 17 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2023 रोजी देशभरासर जगात 132 वी जयंती साजरी करण्यात आली. आंबेडकर जयंतीनिमित्त कोणी पुतळ्यां पुढे नतमस्तक झाले, तर कोणी फोटो पुढे. मात्र बारामती तालुक्यातील मुर्टी ग्रामपंचायतीमध्ये 14 एप्रिल 2023 रोजी वेगळेच चित्र पहायला मिळाले.

डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जळोचीमध्ये घरा-घरात संविधान उपक्रम

मुर्टी ग्रामपंचायत कार्यालयात विविध महापुरुषांची फोटो अडकवलेले आहेत. ग्रामपंचायत कार्यलयाच्या भिंती वरच लटकवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोलाच ग्रामपंचायतीच्या वतीने पूजन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

बारामतीमधील प्रसिद्ध हॉटेलवर कारवाईचे आदेश

यावेळी गावातील महिला देखील उपस्थित होत्या. त्या महिलांनी तर चक्क टेबलचीच पुजा केली. गावचे उपसरपंच आणि समस्त गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थांनी देखिल टेबलवर चडून पुजा केल्याने, नक्की जयंती टेबलची की डॉ. बाबासाहेबांची? याचा संभ्रम मुर्टी ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला.

One Comment on “मुर्टी ग्रामपंचायतीत लटकवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पूजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *