बारामती, 16 एप्रिलः बारामती शहरातील भिगवण रोडवरील प्रसिद्ध हॉटेल लिलाज वर बारामती नगरपरिषदेने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यानच्या काळात लिलाज हॉटेलने समास अंतरामध्ये अनाधिकृतपणे किचन (वाणिज्य) वापर करीत असलेली तक्रार बानपला प्राप्त झाली.
लिलाज हॉटेलच्या सदर इमारतीच्या बहुतालीच्या समाज अंतरामध्ये बांधकाम करण्याची परवानगी नसल्याचे बानपला आढळले. त्यामुळे नगरपरिषदेकडून लिलाज फर्म तर्फे भागीदार गिरीष कुलकर्णी यांना सदर अनाधिकृत बांधकाम त्यांच्या स्तरावर काढण्याचे आदेश दिले आहे. जर हे अनाधिकृत बांधकाम काढले गेले नाही, तर लिलाज हॉटेलवर नियमांनुसार कारवाई करण्याचे आदेश बानपने दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
One Comment on “बारामतीमधील प्रसिद्ध हॉटेलवर कारवाईचे आदेश”