महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

बारामती, 12 एप्रिलः बारामती येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे 11 एप्रिल 2023 रोजी महात्मा जोतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सावानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये युवा, ज्येष्ठ आणि महिला सर्व एकत्रित करून 55 बाटल्यांचे रक्तदान झाले.

पत्रकारावर सासवडमध्ये जीवघेणा हल्ला

रक्तदान शिबीराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बारामती यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक सुधीर सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे, भोला जगताप, अनिकेत मोहिते, निलेश मोरे, सचिन साबळे, अमोल वाघमारे, बबलू जगताप तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

बानपचा बेजबाबदारपणा; लक्ष्मीनारायण नगरला दुषित पाण्याचा पाणीपुरवठा

यावेळी अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी जयंती महोत्सव समिती अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, कार्याध्यक्ष भास्कर दामोदरे, उपाध्यक्ष विराज अवधूते, संदीप रणदिवे, आदित्य सोनवणे, खजिनदार विशाल गायकवाड, सचिव संजय वाघमारे, सहखजिनदार शंकर सोनवणे, साहिल मोरे, स्वप्नील गायकवाड, शुभम गायकवाड व शुभम काकडे यांनी परिश्रम घेतले.

One Comment on “महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *