तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ‘क्विक हिल फाउंडेशन’च्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

बारामती, 13 जुलै: बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या विशेष उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.



कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. निरंजन शाह यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्व पटवून देत, सद्यकालीन सायबर धोके व त्यावर उपाययोजना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या क्विक हिल फाउंडेशनचे प्रशिक्षक श्री. दिपू सिंग यांनी २० निवडक सायबर वॉरियर्सना सायबर सुरक्षेवरील विविध पैलूंवर सविस्तर व समजण्याजोग्या पद्धतीने प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करत त्यांनी सायबर जागरूकतेचा प्रसार करण्यावर भर दिला.



कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, प्रा. विशाल शहा, क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सहयोगी संचालक अजय शिर्के, कार्यसंघ सदस्य साक्षी लवंगारे, गायत्री केसकर आणि प्रशिक्षक दिपू सिंग यांची उपस्थिती लाभली.



कार्यक्रमाची सुरुवात बी.बी.ए. (सी.ए.) विभागप्रमुख व उपक्रम समन्वयक प्रा. सलमा शेख यांच्या मनोगताने झाली. सूत्रसंचालन कु. योगिता माने हिने केले, तर आभार प्रदर्शन प्रा. कल्याणी लोंढे यांनी केले.

उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये क्लबचे अध्यक्ष अभय साहू, सचिव संदीप माने, गतिविधी संचालक ज्योती गुरव, मिडिया संचालक सायली ढगे यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे सायबर वॉरियर्स म्हणून बाळकृष्ण शिंदे, वृशाली जानभरे, वरद साळवे, रोहन लोखंडे, सिद्धार्थ काळे, यश झिंदाडे, सलोनी शेख, माधवी कांबळे, शर्वरी बाचल, गायत्री केंद्रे, प्रिती कापसे, दिप्ती गार्दी, निकीता पोमणे आणि दिशा जाडकर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवर्गाचाही कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *