मुर्टीत माजी विद्यार्थ्यांनी 32 वर्षांनी भरवला दहावीचा वर्ग

बारामती, 5 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी येथील रयत शिक्षण संस्था साताराचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे 1991 च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणीला उजाळा देत तब्बल 32 वर्षांनी वर्ग भरवला. इयत्ता दहावीनंतर आपले मित्र व मैत्रिणी काय करत असतात? आपल्याला शिकवणारे शिक्षक सध्या कसे आहेत? या सर्वांना भेटण्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसम्मेलन (गेट-टु-गेदर) चा कार्यक्रम आयोजित केला होता.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत युतीच्या उमेदवारीचे अर्ज दाखल

सर्वात अगोदर माजी विद्यार्थी हे विद्यार्थी बनून शाळेची घंटा वाजवून परिपाठ केला. नंतर दहावीच्या वर्गात बसून माजी विद्यार्थ्यांनी आठवणीला उजाळा दिला. शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करत गुरू दक्षिणा दिली. सर्वांनी जे शिक्षक वृंद सर्वांना सोडून अनंतात विलीन झालेल्या शिक्षकानां श्रद्धांजली वाहून शिक्षकांना समर्पित करून कृतज्ञ व्यक्त केले.

वैदकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बांधकामात न्यायालयाचा अवमान!

यावेळी इयत्ता दहावी अ आणि ब च्या सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन सतीश (बॉस) व 1991 च्या विद्यार्थ्यांनी केले होते. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन काकासो राजपुरे व विद्या शिंदे यांनी केले.

One Comment on “मुर्टीत माजी विद्यार्थ्यांनी 32 वर्षांनी भरवला दहावीचा वर्ग”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *