बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील ग्रामस्थांची आ. पडळकरांना साकडं!

बारामती, 27 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत/बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मोराळवाडी येथे 26 मार्च 2023 रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शाखेची स्थापना झाली. या शाखेचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाखेच्या अध्यक्षपदी सचिन कारंडे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी रामदास नवले यांची निवड करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, आबासाहेब कोकरे, मच्छिंद्र टिंगरे, पत्रकार बाळासाहेब बालगुडे, बाळासाहेब कळमकर, पत्रकार शरद भगत, सचिन कारंडे रामदास नवले, जोगवडी गावचे सरपंच प्रभू मानवर, तंटामुक्तीचे अध्यक्ष अंकुश महानवर, मोराळवाडी गावचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Most Used

आंबेडकर द्रोह म्हणजे राष्ट्रद्रोही!; चौधरीला हद्दपार करण्याची युवकांची मागणी

दरम्यान, नामदेव कारंडे यांनी मोराळवाडी मूर्ती जोगवडी मासाळवाडी, पळशी, लोणी भापकर, मोरगाव आदी 23 गावांच्या शेतीच्या पाण्याचा जो प्रश्न आहे, तो आत्मीयतेने आ. पडळकरांच्या पुढे मांडला. बारामती तालुक्यातील पुर्वेकडील भाग गेल्या अनेक दशकांपासून दुर्लक्षित आहे. दरवर्षी सदर भागात पाण्याची मोठी टंचाई जाणवते. मात्र सदर भागाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याची कैफियत यावेळी ग्रामस्थांनी आ. पडळकरांसमोर मांडली.

अखेर चोरी गेलेले मोबाईल संबंधितांना केले परत

या संदर्भात लवकरात लवकर मीटिंग बोलवतो, असे गोपीचंद पडळकरांनी जाहीर केले. जो-गोडी गावातील अहिल्याबाई पुतळ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे पडळकरांनी स्वतः उपस्थित राहून तो मार्ग काढण्याचे ही आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे नियोजन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक काटे यांनी केले होते.

One Comment on “बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील ग्रामस्थांची आ. पडळकरांना साकडं!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *