बारामती, 21 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) पंचक्रोशी साहित्य प्रकाशित ‘बारामतीच्या काव्यहिरकणी’ या कविता संग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम दहाफाटा येथील अभिषेक पॅलेस मंगल कार्यालयात नुकताच 19 मार्च 2023 रोजी संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाठ्यपुस्तक कवी हनुमंत चांदगुडे व कवी सोमनाथ सुतार हे उपस्थित होते.
काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर उपस्थितीत कवींची काव्यमैफल चांगलीच रंगली. या काव्यमैफलीत उपस्थित कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. उपस्थितांनीही या कवितांना दाद दिली. या कार्यक्रमामध्ये आनंद विद्यालय होळ येथील विद्यार्थीनींनीही सहभागी होत आपले कलागुण सादर केले.
एमएससीबीचे अधिकारी खेळताहेत सर्वसामन्यांच्या जीवाशी
या कार्यक्रमावेळी बोलतांना कवी हनुमंत चांदगुडे म्हणाले की, ‘ग्रामीण भागात असा कवितासंग्रह व काव्यमैफलीचा कार्यक्रम होतो व या कार्यक्रमाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो, हे पाहून आनंद झाला. त्यांनी कवितासंग्रहाच्या संपादिका कावेरी कर्चे व कार्यक्रमाचे आयोजक बाळासाो कर्चे यांचे कौतूक केले. महिला दिनाचे औचित्य साधून हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला असुन हे कवितासंग्रह प्रकाशन व काव्यमैफलीचे दूसरे वर्ष आहे. महिला कवींना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने हा कवितासंग्रह प्रकाशित करत असल्याचे संपादिका कावेरी कर्चे यांनी सांगितले.
पळशी भाजप युवा मोर्चातर्फे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
या कार्यक्रमासाठी सदोबाची वाडी सरपंच मनिषा होळकर, ग्रामपंचायत होळ सरपंच आशादेवी वायाळ, आनंद विद्यालय होळ च्या मुख्याध्यापिका एच.टी.कर्चे, प्रा. वाळेकर, पत्रकार चिंतामणी क्षिरसागर, निखिल नाटकर, तलाठी अशपाक इनामदार, दादासाहेब आगम, अंक संपादिका सुनंदा कर्चे, नवनाथ मगर, प्रविण सुर्यवंशी, जान्हवी गीते, मकरंद सस्ते, कमलाकर कारंडे, बाबासो भिसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री शुभांगी जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाळासो कर्चे यांनी व्यक्त केले.
2 Comments on “बारामतीच्या काव्यहिरकणी प्रकाशनचा कार्यक्रम रंगला काव्यमैफलीने!”