बारामती, 20 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील पळशी येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे 19 मार्च 2023 रोजी नेत्रतापसणी व शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले. या शिबिरासाठी तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, दिपक काटे, मच्छिंद्र टिंगरे यांनी विशेष सहकार्य केले.
अनुसूचित जाती जमातीमधील 26 महिलांवर बलात्कार; पोलिसांच्या हलगर्जीपणाच्या तपासाचा फटका!
नेत्र तपासणीसाठी नेत्रचिकित्सक डॉ. संतोष रणवरे, शरद शिर्के, सहाय्यक अजित थोरात व सुभाष गायकवाड यांनी यावेळी नेत्र तपासणी केली. या प्रसंगी आष्टविनायक अॅप्टिकल यांच्या वतीने चष्म्यांचे वाटप केले.
‘सुरक्षित बारामती’ अभियानात सामील होण्याचे बानपचे आवाहन
या शिबिरामध्ये 114 लोकांची तपासणी केली असून तब्बल 12 मोतीबिंदू रुग्णांना भारती हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. यावेळी पळशी गावचे माजी सरपंच रावसाहेब चोरमले, माजी उपसरपंच माणिक काळे यासह आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते. संपुर्ण कार्यक्रम बारामती तालुका भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष दादासाहेब करे यांनी आयोजित केला होता.
One Comment on “पळशी भाजप युवा मोर्चातर्फे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न”