मुर्टी ग्रामविकास मंचला यंदाचा बारामती आयकॉन पुरस्कार

बारामती, 17 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती येथील चिराग गार्डन येथे 15 मार्च 2023 रोजी इन्वायरमेंट फोरम या संस्थेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात वसुंधरा पुरस्कार, बारामती आयकॉन पुरस्कार सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमात बारामती तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुर्टी ग्रामविकास मंच आणि प्रसिद्ध वेबसिरीज चांडाळचौकडीच्या करामती यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सदर पुरस्कार इन्वायरमेंट फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात एकूण सहा वैयक्तिक बारामती आयकॉन पुरस्कार आणि तीन ग्रुप आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय वेपन्स लाठीकाठी स्पर्धेत राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूलचे यश

गेल्या दोन वर्षात मुर्टी ग्रामविकास मंचाने बारामती तालुक्यात सर्वाधिक झाडे लावण्याचा विक्रम केला. यामुळे मुर्टी ग्रामविकास मंचाला या पुरस्काराने सन्मानित केले. तसेच येणाऱ्या 23 जुलै 2023 पर्यंत विक्रमी झाडे लावण्याचा मानस मुर्टी ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण जगदाळे व गावातील तरुणांनी केला आहे. या झाडांसाठी अगदी कडक उन्हाळ्यात स्व-खर्चाने पाण्याचा टॅंकर देणारे गणेश जगदाळे, रमेश बालगुडे यांचे ही भरीव योगदान असते.

धनगर आरक्षणासाठी साखळी उपोषणाला सुरुवात

गावातील सर्वच तरुण वृक्षसंवर्धणासाठी सतत कार्यरत असतात, म्हणुनच मुर्टी ग्रामविकास मंचला हा पुरस्कार प्राप्त झाला, अशी माहिती उपसरपंच किरण जगदाळे यांनी दिली.

या पुरस्कार वितरणासाठी ज्येष्ठ माजी ग्रामपंचायत सदस्य छबन राजपुरे, तानाजी राजपुरे, संतोष शिंदे, भाऊ शिंदे, दिपक जगदाळे, हरिमामा जगदाळे, अमोल जगदाळे, मोहन जगदाळे, प्रशांत भेंकी, पत्रकार शरद भगत व अन्य तरूण वर्ग उपस्थित होता. या पुरस्काराचा स्विकार छबन राजपुरे व मोहन जगदाळे यांनी केला.

One Comment on “मुर्टी ग्रामविकास मंचला यंदाचा बारामती आयकॉन पुरस्कार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *