फलटण, 15 मार्चः (प्रतिनिधी – बाळासाहेब बालगुडे) फलटण येथील प्रांत कार्यालयासमोर आज, 15 मार्च 2023 पासून सखल धनगर समाज बांधवांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. धनगर समाजाला एसटी (ST)प्रवर्गातील आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरीता पै. रजनीकांत खटके यांच्या नेतृत्वात सदर उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणात महावीर कोळेकर (लोणंद), दत्तात्रय गावडे (गोखळी), दादासाहेब मासाळ (आठफटा होळ) आदी बसले आहेत.
जळगाव सुपे गावात महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
सदर साखळी उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फलटण तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देत जाहीर पाठिंबा देणारे पत्र उपोषणकर्त्यांना दिले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यात बारामती नगर परिषद अव्वल
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख विकास नाळे, माजी जिल्हा प्रमुख विकास राऊत, उप तालुका प्रमुख अभिजीत कदम, उप तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घाडगे, उप शहर प्रमुख राहुल पवार, तसेच गणेश गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
One Comment on “धनगर आरक्षणासाठी साखळी उपोषणाला सुरुवात”