बारामतीमध्ये तालुका आणि शहर आरपीआयकडून विजयी आनंदोत्सव साजरा

बारामती, 5 मार्चः नागालँड येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाकडून 8 ठिकाणी स्वतंत्र चिन्हावर उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यापैकी 2 ठिकाणी आरपीआय (आठवले) पक्षाचे उमेदवार निवडून आलेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच ईशान्य भारताचे प्रमुख विनोद निकाळजे यांच्या निवडणूक रणनीतीमुळे हा विजय शक्य झाला आहे. या विजयाचा जल्लोष आरपीआय पक्षाच्या बारामती शहर आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बारामती येथील विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इंदापूर चौक आणि माळेगाव बुद्रक येथे 2 मार्च 2023 रोजी आनंदोत्सव साजरा केला.

‘जय भीम’ या दोन शब्दात मोठी ताकद- सूर्यकांत वाघमारे

तसेच या विजयाचे शिल्पकार आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि विनोद निकाळजे यांची भेट घेऊन बारामती शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी अभिनंदन करणार असल्याचे यावेळी सांगितले.

भारतीय नायक दणका! बानप भंगार प्रकरण चौकशी समिती नियुक्त

यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संघटक विजय सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनिल शिंदे, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा रत्नप्रभा साबळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर मोरे, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र(पप्पू) सोनवणे, बारामती तालुका अध्यक्ष संजय वाघमारे, शहराध्यक्ष अभिजित कांबळे, बारामती तालुका महिला आघाडी अध्यक्षा सिमा चोपडे, सिमा घोरपडे, विश्वास भोसले, माऊली कांबळे, राजु कांबळे, निहाल भोसले, मयुर मोरे, देवीदास सरोदे, संग्राम भोसले, नवनाथ भोसले यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

One Comment on “बारामतीमध्ये तालुका आणि शहर आरपीआयकडून विजयी आनंदोत्सव साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *