बारामतीत दिवसाढवळ्या महिलेवर बलात्कार; आरोपी मोकाट

बारामती, 1 मार्चः बारामती एमआयडीसी येथील जिजाऊ शिवसृष्टी कॉर्नर जवळील नक्षत्र गार्डन शेजारी एका पीडित महिलेवर बलात्कार झाला आहे. या बाबतची फिर्याद पीडित महिलेने 18 फेब्रुवारी 2023 रोजी बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.

आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात तब्बल 247 प्रयोग सादर

सदर पीडित महिला ही एकटीच कमवती असल्यामुळे तिच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेत भावाला नोकरी लावतो, अशा आश्वासन देऊन या गरीब महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत जबरदस्ती केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुनील मासाळ (रा. काटेवाडी) याच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. सदर संशयित आरोपी हा राष्ट्रवादीच्या एक बड्या नेत्याचा जवळचा असून पीडितेवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

बानपच्या भंगार चोरीच गोलमाल?

पीडीता ही बाहेर गावची रहिवासी असून तिला बारामतीमध्ये येण्यासही मज्जाव केला जात आहे. तसेच या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता, शोध पथकाची स्थापना केली असून संशयित आरोपीचा शोध चालू आहे, असे तपास अधिकारी दत्तात्रय लेंडवे यांनी सांगितले.

या प्रकरणांमध्ये बारामती महिला बगिनी सुरक्षित आहे का? असं जनसामान्यांमध्ये प्रश्न विचारले जात आहे. पोलिस यंत्रणाबद्दल शंका निर्माण केली जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यकर्ता हे प्रकरण दाबत आहे, यामुळे याबाबत आरोपीला अभय दिल्याचे राष्ट्रवादीवर आरोप केला जात आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधात व राष्ट्रवादीच्या दबाव यंत्राने विरोधात पिढीता महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र आंदोलन करणार असल्याचे आरपीआय (आ) महिला जिल्हाध्यक्ष रत्नप्रभा साबळे यांनी सांगितले आहे.

2 Comments on “बारामतीत दिवसाढवळ्या महिलेवर बलात्कार; आरोपी मोकाट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *