मयत कृष्णाच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे अभिजीत कांबळेंचे आश्वासन

बारामती, 24 फेब्रुवारीः बारामती नगरपरिषद कामगार ठेकेदार नितीन कदम यांचे इंडिके हॉस्पिटॅलिटी एलएलपी कंपनीचे मयत कामगार कृष्णा दिलीप मोरे यांचे 20 फेब्रुवारी 2023 रोजी अपघाती निधन झाले. घरातील तरुण, कर्तृत्ववान, कर्ता मुलगा गेल्याने मोरे कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.

बारामती उपविभागात तब्बल 107 प्रकल्प मंजूर

मयत कृष्णा मोरे यांच्या कुटुंबियास शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन बारामती कंत्राटी कामगारचे अध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी आज, 24 फेब्रुवारी 2023 रोजी कामगारांसमोर व्यक्त केले.

बारामतीत पोलीस छाप्यात लाखोंचा गुटखा माल जप्त

मयत कृष्णा मोरे यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय दैंनिय आहे. घरातील होतकरू, कुटुंबाचा करता धरता तरुण अपघातामुळे निघून गेला आहे. यामुळे मोरे कुटुंबाच्या मागे सर्व संघटना उभे राहिल, अशी ग्वाही बारामती कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी दिली.

One Comment on “मयत कृष्णाच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे अभिजीत कांबळेंचे आश्वासन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *