बारामती, 20 फेब्रुवारीः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मोरगावमधील खंडूखैरेवाडी येथील इंग्रजी माध्यमचे राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुल येथे रविवारी, 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोरगाव येथील मंडळापाशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले.
बेकायदा भंगार विरोधात मुंबईमध्ये आमरण उपोषण
यामध्ये भाषण, लाठी-काठी, दांडपट्टा आदी असे मर्दानी खेळ दाखवले. यामध्ये विद्यालयातील क्रिडा शिक्षक राहूल यादव सरांनी देखील साहसी मर्दानी खेळ दाखवले. विद्यलयाच्या प्रा. मनिषा खैरे यांच्या मार्गदर्शाना खाली संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोन मंजूरीच्या नावावर फसवणूक करणाऱ्याला अखेर अटक
सदर कार्यक्रमची संपुर्ण तयारी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचलन नाना नेवसे यांनी केले तर आभार विद्यालयातील शिक्षक राहूल यादव सरांनी केले.
One Comment on “राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुल खंडूखैरेवाडी येथे शिवजयंती साजरी”