बेकायदा भंगार विरोधात मुंबईमध्ये आमरण उपोषण

बारामती, 19 फेब्रुवारी: प्रबुद्ध युवक संघटनेमार्फत बेकायदेशीर भंगार व्यवसाय विरोधात वारंवार पत्र व्यवहार करून कुठलीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्या कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचे लेखी पत्र पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाला देण्यात आले. त्यामुळे पोलिसांचे धाबे दनानले आहे.

लोन मंजूरीच्या नावावर फसवणूक करणाऱ्याला अखेर अटक

दरम्यान, 26 जानेवारी 2023 रोजी प्रबुद्ध युवक संघटने मार्फत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालय समोर आंदोलन करण्याचे ठरवले होते. परंतु कारवाईचे आश्वासन देऊन हे आंदोलन प्रबुद्ध युवक संघटनेला स्थगित करण्यात संबंधी भाग पाडले.

मोफत ब्युटी पार्लरचे परिपूर्ण क्लासेससाठी आरपीआयची मागणी

त्यानंतर पुढील कारवाई झाली नाही. परप्रांतीय भंगार वाल्यांचे उत्मात चालू असून बेकायदेशीर धंदे चालू आहे. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता भंगारवाले आपला बेकायदेशीर काळा धंदा करत आहे. तरी या धंद्याला आळा बसण्यासाठी व वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी 21 फेब्रुवारी 2023 पासून प्रबुद्ध युवक संघटनेने पोलीस महासंचालक मुंबई येथे आमरण उपोषण करण्याचा निर्धार केल्याची माहिती प्रबुद्ध युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सम्राट गायकवाड, अध्यक्ष अभिजित कांबळे यांनी दिली आहे.

One Comment on “बेकायदा भंगार विरोधात मुंबईमध्ये आमरण उपोषण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *