ग्रामीण क्षेत्रीय कार्यालयात नागरी सुविधा केंद्र सुरू

बारामती, 2 फेब्रुवारीः बारामतीमधील पाटस रोडवरील देशमुख चौकातील अग्निशमन विभागात नागरिकांच्या सोयीसाठी बुधवारी, 1 फेब्रुवारी 2023 रोजी नगरपरिषदेच्या वतीने नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. सदर नागरी सुविधा केंद्रात घरपट्टी, पाणीपट्टी भरणा चालू राहणार आहे.

बारामती पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे रेशन ग्राहक वंचित!

सदर सुविधा केंद्र हे खंडोबा नगर, जामदार रोड, प्रगती नगर, देशमुख वस्ती पाटस रोड, आणि शारदा नगर आदी भागातील नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आले आहे.

देऊळगाव रसाळ गावात विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

सुविधा केंद्र सुरू करण्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील, जयसिंग देशमूख, शारदानगरचे ज्येष्ठ नागरिक दादा काळे, नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे व दीपक गायकवाड यासह नगरपालिका कर्मचारी आणि सेवानिवृत्ती कर्मचारी सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.

One Comment on “ग्रामीण क्षेत्रीय कार्यालयात नागरी सुविधा केंद्र सुरू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *