बारामती एमआयडीसीमध्ये गांजाची तस्करी?

बारामती, 29 जानेवारीः बारामतीमधील रुई पाटी येथे 28 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्री अमली पदार्थाचे मोठा साठा सापडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मध्यरात्री लोकांच्या गर्दीमध्ये ही कारवाई झाल्याची समजते. या संदर्भात तपासणी यंत्रणेने अजूनही दुजारा दिलेला नसला तरी कारवाईचे काम चालू असल्याचे नाव सांगण्याच्या अटीवर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.

कोरोना काळातील थकित मालमत्ता कर बानपने माफ करावा- आरपीआय

एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला अमली पदार्थ पाहता बारामतीमध्ये किरकोळ विक्रेते प्रमाण किती असेल, याचा अंदाज लावायलाच नको. दरम्यान, बारामतीमध्ये गावठी कट्टा पिस्तुले सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. आता अमली पदार्थाची साठे जप्त केले जात आहे. बारामती शहरासह परिसरात हत्यारांचा आणि गरदुल्यांचा अड्डा तर बनत नाही ना? अशी शंका निर्माण केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य आयटीआय कर्मचारी संघटनेच्या सचिव पदी गणेश चव्हाण यांची निवड

आतापर्यंत हत्यार बाळगणारे विक्रेते सापडले आहेत, परंतु अदृश्य हत्यार बाळगणारे सापडणे कठीण होत आहे. आता अमली पदार्थ सापडली आहे. किरकोळ विक्रेते केव्हा सापडणार? बारामतीमध्ये शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटना थांबवण्यास पोलीस यंत्रणा अयशस्वी तर झाली नाही ना, अशी शंका सर्वसाधारण नागरिक व्यक्त करीत आहे.

One Comment on “बारामती एमआयडीसीमध्ये गांजाची तस्करी?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *