बारामती, 19 जानेवारीः बारामती येथील शारदानगर मधील कृषी विज्ञान केंद्रात आज, 19 जानेवारी 2023 पासून कृषिक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या कृषिक 2023 चे प्रदर्शन पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, विद्यार्थी येत आहेत. या कृषिक प्रदर्शनाला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनीही आज, गुरुवारी हजेरी लावली आहे. दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल वादग्रस्त विधानानंतर अब्दुल सत्तार यांच्यावर सर्वस्तरातून टिका होत होती. यानंतर आज, पहिल्यांदाच कुषिमंत्री अब्दुल सत्तार यांचं बारामतीत आगमन झालं आहे.
राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी पाहिलेल्या प्रदर्शनापेक्षा बारामतीचे कृषी प्रदर्शन हे अत्यंत वेगळं आणि नवखं आहे. तसेच राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारे आहे, असे मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज कृषिक प्रदर्शन पाहिल्यानंतर व्यक्त केले.
कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या 170 एकर प्रक्षेत्रावरील पिकांच्या जिवंत प्रात्यक्षिकांसह कृषी क्षेत्रातील नव तंत्रज्ञान कृषीमंत्री सत्तार यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, केंद्र प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे अपघाताचा धोका
कृषीमंत्री सत्तार पुढे म्हणाले की, देशाच्या इतर राज्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर तेथील कृषी शिक्षण आणि विस्तारामध्ये खाजगी विद्यापीठांना मान्यता आहे, परंतु महाराष्ट्रात तशी मान्यता नाही. त्यामुळे अशी मान्यता असेल तर कृषी संशोधनाला बाळ मिळेल आणि त्यातून अधिक चांगलं कृषी क्षेत्रासाठी भरीव काम करता येईल. यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून यासंदर्भातील प्रस्तावाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. भविष्यात खाजगी कृषी विद्यापीठे यावीत आणि त्यांनी कृषी क्षेत्राचा विस्तार आणि विकास करावा, असं माझं देखील स्वतःचं मत आहे, असे ते म्हणाले.
उंडवडी सुपे येथे भरधाव स्कॉर्पिओची एसटी आणि डंपरला धडक
पुढे सत्तार म्हणाले की, मी महिला शिक्षणावरील ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, कै. आप्पासाहेब पवार, राजेंद्र पवार यांनी अखंडपणे केलेल्या या कामामुळे मी प्रभावित झालो आहे. देशी गोवंश सुधार प्रकल्प पाहिला आणि मी अक्षरशः प्रभावित झालो. महिलांना त्यांच्या पायावर उभा करण्याचे सुनंदा पवार या करत असलेल्या कामाची मला अगोदरच माहिती होती, मात्र या ठिकाणी आल्यानंतर हे काम किती विस्तारित आणि किती मोठे आहे, हे मला पहायला मिळाले, असे देखील सत्तारांनी नमूद केले.
2 Comments on “खासदार सुप्रिया सुळेंच्या बारामतीत कृषिमंत्री सत्तारांचे आगमन”