उंडवडी सुपे येथे भरधाव स्कॉर्पिओची एसटी आणि डंपरला धडक

बारामती, 19 जानेवारीः बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील बारामती- पाटस रस्त्यावर आज, 19 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओने एसटी बस आणि डंपरला धडकली. या आपघातात स्कॉर्पिओमधील पाच जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

नव्याने सुरु असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील बारामती- पाटस रस्त्यावर उंडवडी सुपेच्या हद्दीत टोल नाक्याचे काम सुरु आहे. सदर ठिकाणी खडीचा ट्रक उभा होता. यावेळी पाटसकडून भरधाव वेगाने आलेली चार चाकी स्कॉर्पिओ (क्रमांक- एम.एच. 18 टी. 0371) बारामतीकडून पाटसकडे निघालेल्या एस.टी. बसला धडकून बाजूला उभा असलेल्या खडीच्या डंपरला (ट्रक क्रमाक- एम.एच. 12 आरएन 7332) जोरात धडकली.

जप्त वाहनांचा जाहीर ई-लिलाव

सदर अपघातात जखमी झालेले सर्वजण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथील आहेत. जखमींवर बारामती येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपघातानंतर एस.टी. बस न थांबता पाटसच्या दिशेने निघून गेली. त्यामुळे बसचा क्रमांक मिळू शकला नसल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

2 Comments on “उंडवडी सुपे येथे भरधाव स्कॉर्पिओची एसटी आणि डंपरला धडक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *