मेथीचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

प्रत्येक स्वयंपाक घरात मेथी ही राहतेच. मेथी ही जितकी खाण्यासाठी चविष्ट असते तितकीच ती आरोग्यासाठी उपयुक्त असते. अनेक आजारांवर मेथी दाणे हे गुणकारी असतात. मेथीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, प्रोटीन आणि आयर्न यासारखे अनेक पोषक तत्त्व आहेत. मधुमेहीग्रस्त लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी मेथीचा उपयोग होतो.

अनेक औषधी गुणधर्म मेथीमध्ये आढळतात. मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे. रक्तातील साखर कंट्रोल करण्यासाठी मेथीच्या दाण्याची मदत होते. मेथीचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास मधूमेहींनी चांगला फायदा होऊ शकतो. कारण, मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्राव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.

मेथी दाण्यांची चव ही बऱ्यापैकी कडू असते. मात्र, याचा सुवास खूपच छान असतो. याशिवाय बऱ्याच आजारांवर मेथीचे पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो. नैसर्गिक पेनकिलर्स म्हणूनही मेथीचा वापर सुद्धा करण्यात येतोट. मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात. मेथीची पाने बारीक करा आणि आंघोळीच्या अर्धा तास आधी केसांना लावा. यामुळे कोंडा लवकर संपेल. मेथीची पाने भिजवून पेस्ट बनवून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ व मऊ दिसते. मेथीच्या पानात चिकट पोषक घटक असतात. ज्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण होते.

मेथी बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग दूर होतात. मेथीची पाने चेहऱ्यावरील सूज कमी करते. मेथीच्या पानांचा रस लहान मुलांना दररोज एक चमचा दिल्यास पोटातील किडे दूर होतात. छातीत जळजळ होत असल्यास रोजच्या आहारात एक चमचा मेथी दाण्याचा समावेश करा. यासाठी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवा व नंतर स्वयंपाकामध्ये वापरा. तोंड आल्यास, घसा बसल्याच मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते.

आई झाल्यानंतर शरीरामध्ये दूध कमी येण्याची समस्या बऱ्याच महिलांना होते. अशावेळी मेथीचे दाणे आणि मेथीच्या पानांचे सेवन केल्याने शरीरामध्ये दूध तयार करण्यास मदत होते. विटामिन्स आणि मॅग्नेशिअमचे गुण शरीरात दूध अधिक निर्माण करण्यास मदत करतात.

मेथीमध्ये असलेले लोह आणि अन्य पोषक तत्त्व हे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवते तसेच मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी, त्रास आणि मूड स्विंग्जदेखील नियंत्रणात ठेवण्याचे काम करते.

मेथीमध्ये स्यापोनीन असते. जे शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करते. तसेच स्यापोनीन शरीरातील कोलेस्ट्रोलच्या स्तरास दूर करतो. मेथी पोटातील पथरी बाहेर टाकण्यास लाभकारी सिद्ध होते. हानिकारक कोलेस्ट्रोल शरीराबाहेर काढतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *