वकिलांच्या युक्तिवादामुळे पोस्कोमधील आरोपीची निर्दोष मुक्तता

बारामती, 12 जानेवारीः बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व न्यायालयातील प्रलंभीत विशेष पोस्को (POCSO) खटला 53/2022 सरकार विरुद्ध पवन हनुमंत जगताप यांच्यात सुरु होता. यातील आरोपी पवन हनुमंत जगताप याची 11 जानेवारी 2023 रोजी बारामती अति जिल्हा न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीच्या वतीने अ‍ॅड. मंगेश लोंढे आणि अ‍ॅड. अभय जगताप यांनी कामकाज पाहिले.

बारामतीत महिलांसह दोन गटात तुंबळ हाणामारी

दरम्यान, गुन्हातील आरोपीला 16 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय दंड संहिता कलम 354, 354A, 354D, POCSO कायदाचे कलम 8,12 अंतर्गत ह्या गुन्हामध्ये अटक पूर्व जमीन मिळवला होता. त्याच आधारे या गुन्ह्यातील पुरावे आणि साक्ष सरकारी पक्ष सिद्ध करू शकले नाहीत. यामुळे सदर गुन्हा हा खोटा, व नाहक त्रास देण्यासाठी फिर्यादी पक्षाने दाखल केला होतो. तसेच सबळ पुरावे आणि प्रथमदर्शी साक्षीदार नसल्यमुळे यासह साक्ष घेते वेळी ठोस, सत्य पुरावा आढळून न आल्यामुळे बुधवारी 11 जानेवारी रोजी संशयीत आरोपीला यातून निर्दोष मुक्त करण्यात आले.

बारामतीच्या तहसिल कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूटमार

आरोपीच्या आई- वडिलांनी बारामती येथील विशेष (सेशन) कोर्टाचे, तसेच त्यांच्या वकिल अ‍ॅड. मंगेश लोंढे आणि अ‍ॅड. अभय जगताप यांचे आभार मानले.

One Comment on “वकिलांच्या युक्तिवादामुळे पोस्कोमधील आरोपीची निर्दोष मुक्तता”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *