
सदर ठिकाणी दारू गळणारी संशयित आरोपी अलका शशिकांत उर्फ सेशाल्या पवार (रा. इंदिरानगर झोपडपट्टी कंपनी शेजारी पिंपळी) याच्यावर भादवि कलम 328 व दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे कारवाई करून 16 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. तसेच गुणवडी गावच्या हद्दीतील बांदलवाडी येथील मंगल गणेश गंगावणे या महिलेच्या दारू भट्टीवर कारवाई करून त्या ठिकाणावरून 30 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच चारशे लिटर रसायनाचे दोन बॅरल फोडण्यात आले त्या ठिकाणी एकूण 7 हजार 120 रुपयांचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिच्यावर ही वरील प्रमाणेच कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाया पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घोडके निंबाळकर तसेच तपास पथकाचे कल्याण खांडेकर दशरथ कोळेकर, सहाय्यक पोलीस फौजदार काळे यांनी केलेले आहेत.

