बारामती, 10 जानेवारीः बारामती शहरातील ढोर गल्ली आप्पासाहेब पवार मार्ग येथे दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 च्या सुमारास एक अनोळखी इसम चक्कर येऊन पडला. सदर इसमाच्या डोक्याला मार लागल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान 3 नोव्हेंबर 2022 रोजी मयत पावला. सदर मृत इसमाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. यामुळे सदर मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी बारामती शहर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
सदर मृत इसमाची नोंद बारामती शहर पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 88/ 2022 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल आहे. या अनोळखी मृत इसम वय अंदाजे 45 वर्ष आहे. मृत इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.
उघड चेहरा, रंग निंभोरा, उंची 170cm,डोक्यावर काळे केस, चेहऱ्यावर बारीक दाढी मिशी, अंगात नेसणेस लाल रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळसर रंगाची जीन्स पॅन्ट व कमरेस राखाडी रंगाचा बेल्ट अशा वर्णनाचा अनोळखी मृत इसम आहे .
तरी सदर अनोळखी इसमास कोणी ओळखत असल्यास त्याचे बाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे मोबाईल क्रमांक 9552069100 यावर अथवा तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांना मोबाईल नंबर 9822053293 यावर संपर्क साधावा.
One Comment on “ओळख पटविण्यासाठी बारामती शहर पोलिसांचे आवाहन!”