बारामती, 5 जानेवारीः बारामती शहरात बारामती नगरपरिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान 3 (MVA 3.0) व स्वच्छ सर्वेक्षण 2022-23 राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बारामती शहरातील कवि मोरोपंत शिक्षण संस्थामधील विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी यामध्ये विविध टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ वस्तू बनविल्या आहेत. यात टाकाऊ वस्तू प्लास्टिक बाटली, नारळाचे साल, काडी पेटीतील काड्या, आईस्क्रीम कांड्या, कागदी पुठ्ठा यापासून विविध टाकाऊ पर्यावरण पूरक वस्तू बनविल्या. या करिता शाळेचे प्राचार्य, शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शन केले.
One Comment on “विद्यार्थ्यांनी बनविल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू”