मध्यरात्रीपासून महावितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तीन दिवसीय संप

मुंबई, 3 जानेवारीः संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज, 3 जानेवारी 2022 रोजी रात्री 12 वाजले पासून पारेषण आणि वितरण चे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कामगारवर्ग यांचा 72 तास म्हणजेच तीन दिवस संप सुरु होत आहे. सदर संप बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे तीन दिवस असणार आहे. या संपा दरम्यान चुकून जर लाईटचा काही प्रॉब्लेम झाला अथवा लाईट गेली तर ती चालू करण्यासाठी कर्मचारी उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे सर्व नागरिकांनी वापरायचे पाणी, प्यायचे पाणी व जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ दळण हे आजच करून ठेवावे किंवा त्याचा साठा करून ठेवावा.

बारामतीत राज्य ऑलम्पिक स्पर्धा क्रीडाला सुरुवात

पारेषण आणि वितरण चे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कामगार वर्ग हे संपावर जाण्याचे पुढील प्रमाणे कारणे आहेतः

– मुंबई आणि पुणे शहर येथे अदानी इलेक्ट्रिक कंपनी ने समांतर परवान्यासाठी अर्ज केलेला आहे. इतरही नफ्याची शहरे ताब्यात घ्यायचा सदर कंपन्यांचा प्रयत्न आहे.

– सद्यस्थितीत क्रॉस सबसिडीच्या समीकरणातून संपूर्ण महाराष्ट्रात एकच वीजदर लागू केला जातो. ज्यामुळे विजेचे दर नियंत्रणात राहतात.

– असे खाजगीकरण झाल्यास क्रॉस सबसिडीच्या समीकरणावर थेट परिणाम होऊन वीजदर नियंत्रणाबाहेर जातील.

– या गोष्टीला विरोध म्हणूनच आम्ही प्रशासनाला दीड महिन्यापूर्वीच संपाची नोटीस दिली होती.

‘या’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मात्र प्रशासनाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. या संपाचा परिणाम सर्वांवरच होऊ घालणार आहे. वीजपुरवठा आहे असा ठेऊन आम्ही संप सुरू करीत आहोत, पण वीजपुरवठा खंडित झाल्यास तो कधी पूर्ववत होईल, हे सांगता येणार नाही. आपणास सर्व गोष्टींची कल्पना असावी, आणि चुकीच्या बातम्या येऊन गैरसमज होऊ नयेत म्हणून ह्या आवाहनाचा प्रपंच करण्यात आला आहे.

यामुळे मोबाईल आणि तत्सम गोष्टी चार्ज करून ठेवावेत, सर्व शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारी करावी. होणाऱ्या तसदीसाठी दिलगीर आहोत, पण आज नाही तर कधीच नाही. आपल्या सर्वांच्या हक्कासाठी पुढील चांगल्या भवितव्यासाठी संपास पाठिंबा देणे बाबत व सहभागी होण्याबाबत आवाहन करत असल्याचे आंदोलक वीज कर्मचारी, अधिकारी यांनी सांगितले आहे.

One Comment on “मध्यरात्रीपासून महावितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तीन दिवसीय संप”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *