माळेगावात ऊस गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू

बारामती, 1 जानेवारीः सध्या बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याची ऊस वाहतूक सुरु आहे. वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या वाहनातून माळेगाव साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक सुरु आहे. ऊस वाहतून करताना एका ऊस गाडीचा माळेगाव येथील 22 फाट्याजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

तब्बल 227 निराधारांची प्रकरणे मंजूर

माळेगाव कारखान्यात ट्रॅक्टर (क्र. एम. एच. 18 एन 2558) दोन ऊस ट्रॅली जोडून उसाची वाहतूक करत असताना कारखान्यात जवळच एक ट्रॅली 22 फाट्याजवळ कोसळली. या ट्रॅलीत बसलेले कृष्णा वसंत जाधव (वय 21, रा. राजदेहेरे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या अंगावर ऊस पडल्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघात ठिकाणी रस्त्याचे काम झाले आहे. तसेच साईडपट्ट्या व्यवस्थित भरले नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर अपघाताचा तपास पोलीस हवालदार विजय जगताप हे करत आहेत.

वर्धापन दिनानिमित्त बारामती नगरपरिषदेचे आवाहन

One Comment on “माळेगावात ऊस गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *