बारामतीत पोलिसांचे आणीबाणीबाबत प्रशिक्षण

बारामती, 27 एप्रिलः आगामी काळात रमजान ईद आणि अक्षय तृतीया हे सण येत आहे. तसेच राज्यात धार्मिक स्थळांवरील भोंग्याचे आवाजांवरून राजकीय वातावरणात तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळी पोलीस यंत्रणा तयार असावी. या हेतूने बारामती पोलीस उपविभागात येणाऱ्या सर्व पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी बारामती शहरातील टी. सी. कॉलेज मैदानावर आज, बुधवार 27 एप्रिल सकाळी 8 ते 10.30 वाजेपर्यंत राईट स्कीम राबविण्यात आली. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जमाव पांगवण्यासाठी परेडची उजळणी घेण्यात आली.

या प्रशिक्षणात आणीबाणीची वेळ आल्यास इतर पोलिस ठाण्यांकडून तात्काळ किती वेळात मदत दिली जाते, यासह फायर ब्रिगेड, वैद्यकीय मदत आणि पोलीस स्टेशन यांच्यात समन्वय साधून घटनास्थळी किती वेळात पोहोचता येईल, याची चाचणी घेण्यात आली.

यासह जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज कसा करावा, तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याबाबत पोलिसांना प्रशिक्षण हे पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत देण्यात आले. सदरचे प्रशिक्षण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या आदेशान्वये आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.

यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तैयबु मुजावर, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे प्रभारी सोमनाथ लांडे, वालचंद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी बीराप्पा लातूरे, भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी पवार यासह सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ, शिघ्र कृती दल असे मिळून 100 जवान यावेळी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *