वंचितची बारामती शहर व तालुका कार्यकारणी मुलाखती संपन्न

बारामती, 29 डिसेंबरः वंचित बहुजन आघाडीच्या बारामती शहर व तालुका कार्यकर्त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम 28 डिसेंबर 2022 रोजी माळेगाव येथे घेण्यात आला. यावेळी माळेगाव नगरपंचायत बांधणीसाठी वंचित कार्यकर्त्यांची मुलाखती पार पडल्या. यामध्ये विविध जाती धर्मातील लोकांनी सहभाग घेऊन मुलाखती दिल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पहायला मिळाले. सदर कार्यक्रमात वंचितचे जिल्हा अध्यक्ष राज कुमार यांनी मार्गदर्शन केले.

बारामतीच्या मुख्याधिकारी आणि तहसिलदारांना नोटीस

जिल्हा अध्यक्ष राज कुमार यांनी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्यात मोठ्या ताकतीने वाढवणार व कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे सांगितले. या दरम्यान जिल्हा संपर्क प्रमुख अ‍ॅड. वैभव कांबळे, जिल्हा सहसचिव गोविंद कांबळे, जिल्हा संघटक सुजय रणदिवे, जिल्हा सचिव अ‍ॅड. बाबाजान शेख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये शिरष्णेचे विद्यमान उपसरपंच ज्योतिबा खरात यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश केला. कार्यक्रमाचे नियोजन पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

One Comment on “वंचितची बारामती शहर व तालुका कार्यकारणी मुलाखती संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *