बारामती, 20 डिसेंबरः बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 चे मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी पार पडले. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकींचा आज, 20 डिसेंबर 2022 रोजी निकाल जाहीर झाला आहे. बारामती तहसिल कार्यालयाकडून नुकताच मुरुम ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर केला आहे.
मुरुम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि 13 सदस्यांचा निकाल जाहीर झाला आहे. यात सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून संजयकुमार नामदेव शिंगटे हे विजयी झाले असून त्यांना 2165 मते मिळाली आहे.
लोणीभापकर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!
तर अनुसूचित जाती स्त्री प्रभाग क्र. 1 मधून शिवानी शेखर सोनवणे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 514 मते पडली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 1 मधून अश्विनी संदिप चव्हाण या विजयी झाल्या आहेत. त्यांना 539 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 1 मधून विक्रम अशोक शिंदे हे विजयी झाले असून त्यांना 502 मते मिळाली आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्र. 2 मधून प्रज्ञा राहूल शिंदे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 584 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 2 मधून अमोल सुरेशराव जगताप हे विजयी झाले असून त्यांना 557 मते मिळाली आहेत.
अनुसूचित जाती प्रभाग क्र. 3 मधून सोमनाथ प्रताप सोनवणे हे विजयी झाले आहेत. त्यांना 335 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 3 मधून वर्षा सोमनाथ जगताप या विजयी झाल्या असून त्यांना 325 मते मिळाली आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्र. 4 मधून प्रकाश संपत भंडलकर हे विजयी झाले आहेत. त्यांना 267 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 4 मधून रंजना कृष्णा भंडलकर या विजयी झाल्या आहेत. त्यांना 275 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 4 मधून अंकुश मल्हारी भंडलकर हे विजयी झाले असून त्यांना 268 मते मिळाली आहेत.
बारामतीतील 13 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा निकाल जाहीर!
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रभाग क्र. 5 मधून हसिना सुलतान इनामदार या विजयी झाल्या आहेत. त्यांना 465 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 5 मधून सुलभा अजित सोनवणे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 437 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 5 मधून प्रशिल प्रकाश जगताप हे विजयी झाले असून त्यांना 437 मते मिळाली आहेत.
One Comment on “मुरुम ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!”