बारामती, 20 डिसेंबरः बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 चे मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी पार पडले. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकींचा आज, 20 डिसेंबर 2022 रोजी निकाल जाहीर होत आहे. बारामती तहसिल कार्यालयाकडून नुकताच लोणीभापकर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर केला आहे.
लोणीभापकर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि 11 सदस्यांचा निकाल जाहीर झाला आहे. यात सरपंच पदासाठी सर्वसाधारण स्त्री मधून गितांजली रविंद्र भापकर या 1463 मतांनी निवडून आलेल्या आहेत.
बारामतीतील 13 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा निकाल जाहीर!
तर सर्वसाधारण प्रभाग क्र. 1 मधून तानाजी संपत पवार हे विजयी झाले आहेत. त्यांना 381 मते पडली आहेत. अनुसूचित जाती स्त्री प्रभाग क्र. 1 मधून उज्वला प्रकाश कडाळे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 420 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 1 मधून आशा उमेश भापकर या विजयी झाल्या असून त्यांना 387 मते मिळाली आहेत.
सर्वसाधारण प्रभाग क्र. 2 मधून रविंद्र जयवंतराव भापकर हे विजयी झाले आहेत. त्यांना 397 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 2 मधून कविता शरद आरडे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 388 मते मिळाली आहेत. तर सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 2 मधूनच सोनाली संदिप पवार या विजयी झाल्या असून त्यांना 435 मते मिळाली आहेत.
बारामतीत उद्या बंदची हाक!
सर्वसाधारण प्रभाग क्र. 3 मधून सौरभ नवनाथ गोलांडे हे विजयी झाले आहेत. त्यांना 373 मते मिळाली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रभाग क्र. 3 मधून अरूणा आबा ठोंबरे या विजयी झाल्या असून त्यांना 411 मते मिळाली आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्र. 4 मधून नंदकुमार बाळासाो मदने हे विजयी झाले आहेत. त्यांना 350 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 4 मधून श्रीकांत लक्ष्मणराव भापकर हे विजयी झाले आहेत. त्यांना 294 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 4 मधून स्वाती अविनाश बनसोडे या विजयी झाल्या असून त्यांना 336 मते मिळाली आहेत.
One Comment on “लोणीभापकर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!”