बारामती, 19 डिसेंबरः बारामती शहरातील तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर येथे घरफोडीची घटना घडली आहे. या घरफोडीत रोख रक्कम व दागिने असा तब्बल 7 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. सदर घटने बाबत बायनाबाई जाधव यांनी फिर्याद दिली.
बारामतीत शांततेत मतदान; आता लक्ष निकालाकडे!
दरम्यान, फिर्यादी बायनाबाई जाधव ह्या दवाखान्यात जाण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडल्या. उपचारांनंतर त्या सोनगाव येथे आई-वडिलांची भेट घेण्यासाठी गेल्या. उशीर झाल्याने त्यांना त्यांच्या वडिलांनी मुक्कामाचा आग्रह केला. त्यामुळे त्या माहेरी मुक्कामी राहिल्या. त्यानंतर 17 डिसेंबर 2022 रोजी त्या सायंकाळी परत आल्या असता, घराच्या गेटचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच घराला कुलूप नव्हते. घराचा दरवाजा उघडून पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. बेडरूममध्ये पाहणी केली असता तेथील कपाट उघडे दिसले. त्यातील दागिने व रोख रक्कम दिसून आली नाही.
बारामतीत तोडफोड करणाऱ्या गँगवर मोक्कांतर्गत कारवाई
या घटनेत चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 7 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. सदर घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
2 Comments on “बारामतीत घरफोडी; साडेसात लाखांच्या ऐवजावर डल्ला”