बारामती, 15 डिसेंबरः बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत एकूण 66 केंद्रांवर मतदान होणार आहे. यात 13 सरपंच पदांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. तर 137 सदस्यांपैकी 10 सदस्य बिनविरोध झाले आहेत.
शाईफेक प्रकरणातील आंबेडकरी कार्यकर्त्यांचा अखेर जामीन मंजूर
सदर निवडणुकीकरीता प्रशासनाकडून 66 मतदान केंद्रांसाठी एकूण 462 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचारी वर्गांना 7 डिसेंबर व 14 डिसेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच 11 एसटी बस द्वारे त्यांना 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रांवर पाठवण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालाला बानपकडून कचरा टोपलीची परंपरा कायम
तसेच 18 डिसेंबर 2012 रोजी मतदान झाल्यानंतर सर्व सीलबंद मत पेट्या (ईव्हीएम) मशीन बारामती तहसील कार्यालयातील हॉलमध्ये पोलीस बंदोबसात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. नुकताच तहसील कार्यालय बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचे सील बंद प्रशिक्षण दिले. यावेळी नायब तहसीलदार करे, मंडलाधिकारी सय्यद, तलाठी मोरे मॅडम, जगताप तलाठी, मंडलाधिकारी मुळे, मंडलाधिकारी पारदी आदी उपस्थित होते.
One Comment on “बारामतीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!”