भाजप अनु. जाती मोर्चाच्या शहराध्यक्ष पदी चैतन्य गालिंदे

बारामती, 22 एप्रिलः भारतीय जनता पार्टीचे संघटनेत निष्ठेने आणि प्रामाणिक काम केल्याने चैतन्य शेखर गालिंदे यांची भाजप अनुसूचीत जाती मोर्चाच्या बारामती शहर अध्यक्ष पदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र भाजप महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे चिटणीस यशपाल भोसले यांच्या सूचनेनुसार भाजप अनुसूचीत जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे सचिन साबळे यांनी दिले आहे.

बारामती नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांना लवकरच होत आहे. यामुळे या पद वाटप केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन जबाबदारींची जाणीव होतेच आणि पक्षात काम करण्याची ऊर्जाही मिळते. यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत पक्ष बांधणीत आणि पक्ष संघटनेचे काम वाढविण्यासाठी मोठी मदत मिळत असल्याचे मत सचिन साबळे यांनी सांगितले.

आगामी काळात पक्ष बांधणीत आणि कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी मोठे काम उभे करीन, असे चैतन्य गालिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अथक परिश्रम करून मिळाल्या पदाला न्याय देण्याचे काम करेन, असेही चैतन्य गालिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *