बारामती, 12 डिसेंबरः बहुजन महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणारे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोऱ्हाळे बुद्रुक येथे 10 डिसेंबर 2022 रोजी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटलांनिषेधात घोषणा देऊन त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
बारामती शहर पोलिसांकडून चोरीच्या तब्बल 3 लाखांच्या दुचाकी जप्त
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील संत पिठाच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य हे सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता भिक मागून केले’ असे विधान केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप धापटे, माजी उपसरपंच दत्तात्रय माळशिकारे, हेमंत गडकरी, लखन कडाळे, जितेंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली.
महसूल विभागाचा बदल्यातील बेकायदेशीर धंदा!
या प्रसंगी सरपंच रविंद्र खोमणे, माजी उपसरपंच अंकुश चव्हाण, बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष महेश चव्हाण, नंदकुमार कोंढाळकर, अनिल चव्हाण, म्हस्कु चव्हाण, प्रतीक चव्हाण आणि कोऱ्हाळे बुद्रुक येथील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
One Comment on “कोऱ्हाळे बुद्रुक येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटली यांचा निषेध!”