बारामती, 9 डिसेंबरः बारामती तालुक्यातील माळेगाव येथील दि. माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा अंतर्गत सुरक्षा बाबत नियम सांगून अंतर्गत रिफ्लेक्टर लावण्यात आले. दि. माळेगाव सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा मोहीम अंतर्गत माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनात ऊस वाहतुक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी आदी वाहतूक करणाऱ्यांना सुरक्षा बाबत माहिती देऊन रिफ्लेक्टर लावण्यात आले.
वैद्यकीय विद्यार्थ्याला नग्न करून लुटणाऱ्यांना अवघ्या 4 तासात अटक!
या वेळी व्हा. चेअरमन सागर जाधव, संचालक राजेंद्र ढवाण, कार्यकारी संचालक जगताप, सहायक आर. टी. ओ. तावरे मॅडम, माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक साळवे, पोलिस अंमलदार पाटोळे, शेख, कांबळे, शेतकी अधिकारी काळे, सुरक्षा अधिकारी वाघ, केन. सुपरवायझर तावरे, शेखर जगताप, वाहतूक संघटनेचे सागर तावरे यासह पदाधिकारी, ट्रॅक्टर चालक उपस्थित होते.
नागरीकांनी अनुभवली सुर्याची दोन प्रतिबिंब!
2 Comments on “माळेगाव कारखान्यांच्या ऊस वाहनांना रिफ्लेक्टर”