शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अमोल घोडके यांची निवड

बारामती, 7 डिसेंबरः शैक्षणिक क्षेत्रातील नवीन संशोधनाला चालना मिळावी आणि प्रयोगशील शिक्षकांना हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी मागील वर्षापासून यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने शरदचंद्र पवार फेलोशिप इन एज्युकेशन दिली जातो. तसेच 2023 या वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशिपचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात बारामती येथील शारदानगरच्या शारदाबाई पवार विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अमोल घोडके यांच्या ‘पझल रूम- मेंदूची व्यायामशाळा’ या प्रकल्पाची निवड झाली आहे.

मागील वर्षी याच शाळेतील शिक्षिका वर्षा गायकवाड यांच्या ‘स्वयंपाक घरातून संशोधनाकडे’ या विषयासाठी फेलोशिप मिळाली. त्या प्रकल्पातून प्राथमिक विभागाच्या विद्यार्थी स्वयंपाक घरातील अनेक नाविन्यपूर्ण पाककृती स्वतः शिकत आहेत. या पाककृती शिकत शिकत अगदी बालवाडीपासूनची मुलांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळत आहे.’

बारामतीच्या ‘या’ गावावर पाणी संकट!

पझल रूम (मेंदूची व्यायामशाळा) या नावातच उपक्रमाचे वेगळेपण आहे. मुलांना कोणतेही बंधन न घालता एकाच जागी लक्षपूर्वक काम करायला लावण्याची ताकद या उपक्रमात आहे. कोविड कालावधीनंतर मुलांना स्क्रीनपासून दूर केल्यास त्यांच्या दिसणारा आक्रमकपणा, आततायीपणा, आक्रस्ताळेपणा लक्षणीय आहे.

आपल्याकडे अगदी पूर्वीपासून वेगवेगळी कोडी (पझल्स) चालत आली आहेत. ती वर्षानुवर्षे सोडवताना काही कौशल्ये आपोआप विकसित झाली आहेत. मात्र पझल रूममध्ये त्याची जाणीवपूर्वक मांडणी करून मुलांच्या क्षमता विकसित करता येतील. केवळ 1 किंवा 2 मिनिटांत रुबिक क्यूब सारखी कोडी सोडवणारी अनेक मुले आपल्याही आजूबाजूला पाहायला मिळतील. मात्र त्यानंतर पुढच्या लेवल माहित किंवा उपलब्ध नसणारी ही मुले मोबाईलकडे वळतात. स्कॉलरशिपसारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांनाही गणितीय, मर्मदृष्टी, तार्किक बुद्धीमत्ता ही कौशल्ये विकसित करणारा हा उपक्रम आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वस्तू सेवा कर कार्यालयात अभिवादन

शारदानगर येथे मागील काही वर्षांपासून शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक बदल होत आहेत. यासाठी शिक्षकांना भारतातील अनेक प्रयोगशील शाळा तसेच कोस्टारिका, इंडोनेशिया, इस्त्राईल, नेदरलँड्स अशा विविध देशांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. याबरोबरच 2019 पासून शालेय शिक्षणासाठी नेदरलँड्स येथील हान युनिवर्सिटी बरोबर शिक्षक आदानप्रदान करार केला आहे. यामुळे मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण येथे मिळत आहे.

‘संस्थेच्या शारदानगर येथील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याबरोबरच सामाजिक जाणिवेतून परिसरातील शिक्षकांनाही सायन्स सेन्टरच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचा आमचा मानस आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा फेलोशिपची गरज होती, ती यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांनी पूर्ण केली आहे. पारंपारिक शिक्षणापलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाने समृध्द असे शिक्षण देण्याकडे भविष्यातही आमचा कल राहील, असे मनोगत संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

या फेलोशिपसाठी शारदाबाई पवार विद्यामंदिरच्या सर्व शिक्षक वर्गाचे सहकार्य मिळाले. समन्वयक प्रशांत तनपुरे, विश्वस्त सुनंदा पवार, चेअरमन राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

One Comment on “शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अमोल घोडके यांची निवड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *