बारामतीत गायी चोरीचा गुन्हा उघड

बारामती, 6 डिसेंबरः बारामती तालुक्यातील मौजे मेडद येथे गायी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात माळेगाव पोलिसांना मोठं यश आले आहे. गायी चोरीच्या प्रकरणात माळेगाव पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरीस गेलेल्या 1 गायी, 3 कालवडी, वाहन असा तब्बल 5 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दरम्यान, माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामधील मेडद गावच्या हद्दीतून 2 डिसेंबर 2022 रोजी यांचे मध्यरात्री 1.30 च्या सुमारास महादेव पानगे यांच्या घरासमोर बांधलेल्या काळे बांडे रंगाची एक गाय व काळे बांडे रंगाची एक कालवड असे एकुण 95 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. या बाबत पानगे यांनी माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस स्टेशन भा. दं. वि. 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

गायरान गटातील अतिक्रमणावर कारवाई करू नका

सदर गुन्ह्याचे अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले. तसेच पुढील तपासाचे अनुषंगाने दोन स्वतंत्र तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली. सदर तपास पथकामधील पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे, प्रवीण वायसे, ज्ञानेश्वर मोरे यांनी सदर गुन्ह्याचा केलेल्या तांत्रिक तपासात चोरीस गेलेल्या एक गाय व कालवड वाहतूकीसाठी टाटा कंपनीचा एमएच 42 बीएफ 1367 क्रमांकाचा चारचाकी टॅम्पो वापरण्यात आला असलेबाबतची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी शुभम झेंडे (वय 28, मुळ रा. 88 चाळ गुरसाळे ता. माळशिरस जि.सोलापुर, सध्या रा. पिंपळी ता. बारामती जि. पुणे), सौरभ डांभरे (रा. शिर्सुफळ ता. बारामती जि. पुणे) यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे कसून चौकशी केली.

सदर चौकशीत संशयित आरोपींनी माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मेडद गावातून 2 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्री एक गाय व एक कालवड चोरी केल्याचे कबुली दिली. तसेच तत्पूर्वी याच संशयित आरोपींनी बारामती तालुक्यातील मौजे बांदलवाडी व पिंपळी या गावच्या हद्दीतून दोन कालवडी चोरी केलेची कबुली दिली. या दोन्ही संशयित आरोपींकडून एकूण 1 गायींसह 3 कालवडी असा तब्बल 5 लाख 95 हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रिडा स्पर्धेत बीटीसीए विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सदर कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोसइ देविदास साळवे, स. पो. फौ. जयवंत ताकवणे, पो. हवा. संजय मोहिते, पोलीस नाईक प्रवीण वायसे, ज्ञानेश्वर सानप, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, नंदकुमार गव्हाणे, नितीन कांबळे, सुशांत तारळेकर, अमोल राउत यांनी केली आहे.

2 Comments on “बारामतीत गायी चोरीचा गुन्हा उघड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *