बारामती, 4 डिसेंबरः लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मतदार नोंदणी केली पाहिजे, असे आवाहन माळेगाव नगर पंचायतच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले. दरम्यान, उद्या 5 डिसेंबर 2022 रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती तलाठी अमोल मारग यांनी दिली.
जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रिडा स्पर्धेत बीटीसीए विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
मतदार याद्यांचे विशेष पुनर्रचना अभियान निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कार्यालयात एक बैठक मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या अध्यक्षतेखाली व तलाठी अमोल मारग यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मतदार नोंदणी करणारे शिक्षक, महिला बचत गट, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बारामतीच्या सुपुत्राची राज्यकर निरीक्षक पदावर पदोन्नती!
माळेगाव नगर पंचायत कार्यालयाशेजारी उद्या सोमवार, 5 डिसेंबर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये नवमतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, मृत्यू पावलेल्या मतदारांची नावे कमी करणे, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीयपंथीय, घर नसलेल्या भटक्या विमुक्त जमातीतील व्यक्ती यांची नोंदणी करण्यात येईल. तरी या विशेष मोहिमेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी स्मिता काळे तसेच तलाठी अमोल मारग यांनी केले आहे.
2 Comments on “उद्यापासून माळेगावात विशेष मतदार नोंदणी मोहीम”